शरद वालसिंगे
ग्रामीण प्रतिनिधी
अकोट : तालुक्यातील दिवठाणा गावामध्ये श्री संत एकनाथ महाराज यात्रा महोत्सव उत्साहात साजरा जगभरातील कोरोणा महामारीच्या काळात सर्व धार्मीक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम मागील दोन वर्षांपासून बंद होते. या वर्षी सरकारनी सर्व सार्वजनिक कार्यक्रमावरील निर्बंध उठवील्यामुळे येणाऱ्या प्रत्येक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहेत. त्यांतच दिवाळी नंतर दिवठाणा येथील श्री संत एकनाथ महाराज मंदिरात यांत्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. संस्थानच्या वतीने मंगळवार, 22 नोव्हेंबर रोजी श्री संत एकनाथ महाराजांच्या पादुका मिरवणूक काढण्यात आली आहे.22 तारखेला दुपारी 3 वाजता श्री संत एकनाथ महाराजांच्या पादुका पालखी मध्ये ठेऊन पुष्पहार व फुलांनी पालखी सजवण्यात येते.
मंदिराचे व्यवस्थापक रमेशराव महाराज यांच्या हस्ते पादुका पूजन करण्यात आले व भजनाच्या गजरात पादुका पालखी मधून गावातील मुख्य रस्त्याने फिरवण्यात आली आहे. मिरवणुकीदरम्यान गावातील सर्व नागरिक या पालखी पूजाअर्चा करतात. सायंकाळी ५ वाजता मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता झाली आहे. त्यानंतर दहीहांडी कार्यक्रम व महाप्रसादाचे वितरण होते. हा पालखी सोहळा महिलांसाठी महत्त्वपूर्ण असतो. दिवठाणा येथील लग्न झालेल्या मुली दिवाळीला माहेरी न येता श्री संत एकनाथ महाराजांच्या यात्रेसाठी येतात. त्यामुळे गावात दिवाळीसारखेच वातावरण तयार होते. या यात्रेला पुरातन वर्षांची परंपरा असल्याचे गावातील वृध्द नागरिक सांगतात.