अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
अकोला : दि. २१ नोव्हेंबर,२०२२ स्थानिक नायगाव येथील डंपिंग ग्राउंड भागात एका गरीब कष्टकरी कुटुंबात राहणाऱ्या विशाल नंदागवळी यांनी याचं परिसरातील कचरा वेचणाऱ्या शिक्षणापासुन वंचित असणाऱ्या मुलांसाठी निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटी व बालकल्याण विभाग अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने या वस्तीतील मुला-मुलींसाठी वंचितांची शाळा सुरु केली.आणि या मुलांच्या ही आयुष्यात सर्वसामान्य मुलांप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश पाडण्याचे कार्य सातत्याने सुरु ठेवले.कारण या जगात चमत्कार जर होत असतील तर ते केवळ आणि केवळ शिक्षणानेचं होतात यावर त्यांचा दृढ आत्मविश्वास आहे.आपल्या अभ्यासपूर्ण आणि बहारदार वक्तृत्व शैलीमुळे ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहेत.अकोल्याचे नांव त्यांनी महाराष्ट्र भर पोहोचविले आहे. त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान वाखानन्याजोगे आहे.
एकूनचं एक अजातशत्रू असे व्यक्तीमत्व विशाल नंदागवळी त्यांच्या या उल्लेखनीय कामगारीबद्दल अकोला येथील विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये ‘युवा आयकॉन पुरस्कार’ देऊन त्यांना गौरविण्यात आले.हा पुरस्काराचे श्रेय त्यांनी आई-वडील आणि गुरुवर्य प्रोफेसर डॉ. एम. आर. इंगळे यांना देतात. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल डॅा. मनोहर वासनिक, प्रा. राहुल माहुरे, प्रा. प्रकाश गवई, प्रा. ॲड. आकाश हराळ, अमीत लोंढे, विक्की मोटे, राहुल कुरे, आदित्य बावनगडे, रोहीत पाटील, आकाश जाधव, विशाल इंगळे, रोहन काळे, सागर तेलगोटे, आनंद धानोरकर, भरत चांदवडकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.