अनोख गहले
तालुका प्रतिनिधी, अकोट
अकोट : पुल वाहतूकीस बंद करण्यात आल्याने परिसरातील जनतेच्या मागणीवरून जिल्ह्यातील भाजपा लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अकोला-अकोट-अकोला रेल्वे शटल सेवा प्रारंभ होत असून अकोला रेल्वेस्थानकाच्या प्लॅट फॉ र्म क्रं. ६ वरून बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पहिली गाडी रवाना होणार आहे. खासदार संजय धोत्रे यांच्या मागणीची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा करीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून अकोला-अकोट ही ८ डब्यांची शटलगाडी दररोज दोन फेऱ्या मंजूर करून घेतल्या आहेत. अकोला रेल्वेस्थानकावर बुधवारी सकाळी कार्यकर्ते हजारो नागरिकांच्या साक्षीने सकाळी ११ वाजता सुटणार पहिली फेरी प्लॅटफॉर्म नंबर ६ वरून २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाइन हिरवी झेंडी दाखविणार आहेत. यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ऑनलाइन उपस्थितीत खासदार संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश आहे. पिपळे, आ. नितीन देशमुख, आ. वसंत खंडेलवाल, आ. डॉ. रणजीत पाटील, आ. किरण सरनाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. खासदार संजय भाऊ धोत्रे त्या पाठपुरावा आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी आपले सहकारी आमदार यांच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालय तसेच उपमुख्यमंत्री तसेच वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न करून जनतेची मागणी पूर्तता केली अकोला रेल्वे वतीने प्रवाशांच्या स्वागताची तयारी तसेच जल्लोष तसेच आकोट येथे गांधीग्राम उगवा, पाटसुल इथे सुद्धा स्वागत करण्यात येत असून तिन्ही ठिकाणी ३० रुपये रेल्वे तिकीट उपलब्ध करण्यात आली आहे. किर्तन तसेच वारकरी, विविध समाजसेवक मातृ शक्ती मोठ्या संख्येने जल्लोष साजरा करणार


