कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या द्वारा आयोजित तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत गुरुकुल कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल पुसदच्या संघाची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. ही स्पर्धा 22 नोव्हेंबर रोजी येथील सेंट मेरी स्कूल मध्ये पार पडली . यात गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १७ वर्षे वयोगटात खो-खो खेळात अंतिम सामन्यात सुधाकरराव नाईक माध्यमिक शाळा जनुना या शाळेचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला. विक्रम सिंग राठोड यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हास्तरावर निवड झाली. या संघात खेळाडू. मोहन बीस्ट , हृषिकेश दशरथकर, प्रथमेश चव्हाण , राज असोले , रितेश राठोड , गौरव राठोड , आशिष चव्हाण , मोहन काळे , राजदीप कांबळे, शशांक मस्के, आदित्य सरकाळे , कृष्णा व्यवहारे व शिवराज जाधव या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे संचालक धनंजय चापके, क्रीडा मार्गदर्शक विक्रम सिंग राठोड व सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले .


