विशाल कालापाड
जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम : सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात रॅगिंग तक्रार निवारण समिती आणि महिला तक्रार निवारण समितीच्या संयुक्त विद्यमाने बालकल्याण समिती वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 19 ऑक्टोबर 2022 रोजी बालकांचे संरक्षण व काळजी आणि महिला व बाल अत्याचार या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर वाहाणे तसेच प्रमुख पाहुणे बालकल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. अलका मकासरे , श्री विनोद पट्टेबहादूर ऍडअनिल उंडाळ , श्री बालाजी गंगावणे आणि डॉ. मंजुश्री जांभरुणकर उपस्थित होत्या. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक माता सावित्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचे स्वागत तसेच मान्यवरांचा परिचय रॅगिंग समिती समन्वयक प्रा. डॉ. भारती देशमुख यांनी करून दिला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समिती समन्वयक प्रा. दिपाली देशमुख यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे बालकल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. अलका मकासरे यांनी बालकांच्या संरक्षणाबाबतच्या विविध उपाय योजना आणि त्या संदर्भातील तरतुदी याबाबत मार्गदर्शन केले ,श्री विनोद पट्टेबहादूर यांनी बालकल्याण समितीची कार्यपद्धती तसेच या कार्याचे महत्त्व समाजासाठी किती उपयोगी आहे याबद्दल माहिती दिली . ऍड सअनिल उंडाळे यांनी बालकांच्या संरक्षणासंदर्भातील विविध कायद्यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . डॉ. मंजुश्री जांभरुणकर यांनी बालकल्याण समितीच्या कार्याचा प्रसार समाज कार्यकर्त्यांनी आपल्या गावामध्ये कशा पद्धतीने करावा आणि याचे महत्त्व सांगितले .कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . किशोर वाहाणे यांनी समाज कार्यकर्त्या विद्यार्थ्यांना असे आव्हान केले की बालकल्याण समितीचे कार्य समाजामध्ये पोहोचवून जनजागृती करावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती इंगळे हिने केले तर ,आभार प्रदर्शन मनिषा कालवे या कार्यक्रमास डॉ. संजय साळीवकर , प्रा.पंडित नरवाडे, प्रा .गजानन बारड ,प्रा. रवींद्र पवार, प्रा. जयश्री काळे, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.











