समाधान पाटील
तालुका प्रतिनिधी चिखली
चिखली : शा.प्र.दि.17 ऑक्टोबर राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु क्रॉप सायन्स कॉलेज पळसखेड भट च्या संघाने 3री राज्यस्तरीय राजा शिवछत्रपती मार्शल आर्ट अजिंक्य स्पर्धा-2022 मध्ये घवघवीत यश संपादन करीत एकुण 31 सुवर्ण पदकांची कमाई केली.सविस्तर वृत्त असे की, जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पळसखेड भट चा संघ क्रिडा प्रशिक्षक पंकज शेळके यांच्या नेतृत्वात बुलढाणा येथे झालेल्या राज्यस्तरीय राजा शिवछत्रपती मार्शल आर्ट स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यात शाळेच्या संघाने कराटे व तायक्वांडो स्पर्धेत मुंबई, पुणे, हिंगोली व अकोला खेळाडूंना मात देत एकुण 31 सुवर्ण पदकांची कमाई केली. व ट्रॉफी वर आपले नाव कोरले. यात नम्रता धोडु खंडागळे, अंजली विजय चिकटे , साक्षी हनवते, वैष्णवी विजय गायकवाड, आकांक्षा जाधव ,सई मनोहर सिरसाट, वेदिका जिवन सिरसाट, श्रद्धा पांडुरंग झगडे,सृष्टी मोरे, सानिका धनवे, आशिष दांडगे, यश गुळवे, प्रणव देशमाने, समर्थ देशमाने, आदित्य सिरसाट, उमेश भुसारी, आर्यन धनावत, प्रज्वल धनावत, नैतिक कवाळ, प्रेम ठाकूर, धनंजय सोनाळकर, शेख सुफीयान, सोहम पवार, यश जुंबड, अश्विन देशमाने, सुमित कुडके, शिवम उबाळे, यश तरमळे, अमन देशमुख, सोहम लोखंडे, समर्थ भोसले या सर्व खेळाडूंनी अतिशय चुरशीची खेळी करत सुवर्णपदकांची कमाई केली व शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. शाळेच्या वतीने सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.या स्पर्धेसाठी संस्था अध्यक्ष मा. संदीप दादा शेळके व शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.


