रितेशकुमार टीलावत
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड : येथील स्थानिक सेंट पॉल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमधून जिल्हास्तरासाठी निवड झालेली आहे. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचा आयोजन तेल्हारा येथे होत असून त्यामधील योग क्रीडा प्रकाराच्या तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन सेंट पॉल अकॅडमी हिवरखेडे येथे करण्यात आलेल होते त्यामध्ये सेंटपॉल अकॅडमी येथील 14 वर्षे वयोगटात इयत्ता सातवीची विद्यार्थिनी भक्ती जितेंद्र लखोटिया व प्रसाद गावंडे तसेच सतरा वर्ष वयोगटात इयत्ता दहावीची विद्यार्थी मंजिरी प्रमोद राहणे व भावीक जितेंद्र लखोटीया या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्हा स्तरासाठी निवड झालेली झालेली आहे. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी सर व परीक्षक म्हणून निमिता गांधी मॅडम ह्या उपस्थित होत्या. या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे क्रीडा शिक्षक श्री जगदीश वडाळकर सर यांना व आपल्या आई-वडिलांना दिले आहे. या कार्यक्रमाला , अहेरकर सर, खारोडे सर,वसे सर,बावणे सर, येलुकार मॅडम, ढोले मॅडम, पाटील मॅडम उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक श्री नवनीतजी लखोटीया सर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री.लुणकरणजी डागा सर व संस्थेचे सचिव प्रमोदजी चांडक सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.