अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील यांचे शनिवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे हाेते. पिसे यांच्या निधनाने मनमिळावू नेतृत्व हरपले असून, कधीही न भरून निघणारी राजकीय-सामाजिक पोकळी निर्माण झाली, अशा शब्दात मान्यवरांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
हेही वाचा :
- डेक्कन शुगर साखर कारखान्याची ऊस आयात जोमात
- संतोष पाटील यांची शिक्षकेतर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती
- अब्बब्ब ५०० लिटर रसायन नाश करून तीस बाटली देशी दारू जप्त
- ताडोबा व्याघ्र प्रकल्पा जवळ असलेल्या त्या नियमबाह्य रिसाॅर्टसह वन अधिकाऱ्यांवर कारवाई करा :- उपसरपंच अशोक ज्ञानेश्वर चौधरी
- इजनी गणातुन प.समीतीसाठी प्रभावी उमेदवाराची गरज : मनोज चव्हाण
आजारी असलेल्या श्रीकांत पिसे यांची प्राणज्याेत शनिवारी सकाळी मालवली. त्यांच्यावर उमरी स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा शिवराज यांनी मुखाग्नी दिला. त्यांच्या पश्चात भाऊ, बहिणी, पत्नी, मुलगी, मुलगा यांच्यासह आप्त परिवार आहे.











