संजय पराडके
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार : एन. मुक्ता संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने आमदार राजेश पाडवी यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावे या संधर्भात निवेदन देण्यात आले.अखिल भारतीय शैक्षिक महासंघ संलग्रीत आणि कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रात कार्यरत नार्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड टीचर असोसिएशन (एन मुक्ता )संघटनेच्या वतीने शहादा – तळोदा मतदार संघांचे आमदार राजेश पाडवी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या संदर्भात निवेदन देण्यात आले, या निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या दि : 31/10/2005 रोजी शासन निर्णनन्वये राज्य शासनाच्या सेवेत अथवा शासन अनुदानित सेवेत दि.1/11/2005 रोजी किवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन (डी. सी. पी.)लागू केलेला असून त्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या निवृत्ती वेतन विषयक तरतुदी पूर्णपणे भिन्न व कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक आहेत. जुन्या पेन्शन योजना ठराविक सूत्रनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास हमीचे निवृत्ती वेतन प्रमाण करण्यात येते. कर्मचाऱ्याला व त्यांच्या कुटुंबाला त्या माध्यमातून आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात आलेली होती. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचे सामाजिक जीवन सुरक्षित होते. तसेच देशातील राजस्थान, छत्तीसगड राज्यांनी तसेच झारखंड, दिल्ली व पंजाब सरकार लागू डी. सी. पी. एस. व एन. पी. एस. ऐवजी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल केलेली आहे.त्याचे अनुकरण करून महाराष्ट्र शासनाने देखील नवीन अंशत निवृत्ती वेतन डी. सी. पी. एस. व एस. पी. एस. योजनेऐवजी संपूर्ण राज्यभरातील प्राध्यापक व शिक्षक, शिक्षकेत्तर सर्व सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन योजना अर्थात जुनी पेन्शन योजना शासनाने लागू करण्यात यावी असे निवेदणाद्वारे मागणी करण्यात आली आहे. यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी ही न्याय्य असून सदर निवेदन हे महाराष्ट्र शासन पर्यंत पोहचवून यावर सकारात्मक व धोरणात्मक निर्णय घेण्यास प्रवृत्त करण्यास भाग पाडू असे सांगितले. या प्रसंगी एन. मुक्ता संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. अरविंद कांबळे, सचिव प्रा. डॉ. भगवान चौधरी केंद्रीय सदस्य प्रा. डॉ. भारत चाळसे, डॉ. विजय शर्मा कोषाध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद पाटील आदी पदाधिकारी उवस्थित होते.