संजय पराडके
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील असली माथा असली व रामसूला येथील कांग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हा प्रमुख आमदार आमशा पाडवी यांचा नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थितीत प्रवेश करण्यात आला. कांग्रेस कार्यकर्त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाणे माझी मंत्री आमदार के. सी. पाडवी यांचा गडमध्ये खिंडार पाडण्यात आमदार आमशा पाडवी यांनी यश प्राप्त केले आहे. असली व रामसूला येथे ग्रामपंचायत निवडूकीत शिवसेनेचे स्वतंत्र पॅनल निवडणूक लढवत आहे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद कृषी सभापती गणेश पराडके, शिवसेना संघटक लक्ष्मण वाडीले, धडगाव तालुका प्रमुख महेश पाडवी, मोहन महाराजसह आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.