वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव : नेताजी विद्यालय राळेगाव येथे पालक शिक्षक सभेचे आयोजन दि 30/09/2022 ला करण्यात आले होते. या सभेसाठी अनेक पालक उपस्थित होते.सभेची सुरुवात स्फुर्तीनायका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली सभेमध्ये विध्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, बाहेर गाव वरून ये-जा करण्याऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी या विषयी चर्चा करण्यात आली,तसेच शाळेतून दिल्या जाणारा गृहपाठ विद्यार्थ्यांकडून करून घेण्याविषयी मुख्याध्यापक श्री ओंकार सर यांनी पालकांना विशेष मार्गदर्शन केले, तसेच भविष्यात शालेय स्थरावर आयोजित होणाऱ्या सहली,सांस्कृतिक कार्यक्रम या विषयी चर्चा करण्यात आली तसेच पालकांकडून सूचना मागविण्यात आल्या सभेचे अध्यक्ष स्थान पालक श्री राऊत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पालक श्रीमती धोटे यांनी भूषविले सभेचे संचालन श्री वासेकर सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन नागरे मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षक श्री वासेकर सर, कु केवटे मॅडम, सिडाम मॅडम, चावट मॅडम सोनोने मॅडम, कुबडे सर, वानखडे मॅडम ,नागरे मॅडम शेख मॅडम व सचिन पांडे यांनी अथक परिश्रम घेतले.