चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी अकोट
अकोट : महाराष्ट्र सह विदर्भातील विशेषतः शहरातील परिसरातील भाविक भक्तांचे शक्तिपीठ म्हणून आदिशक्ती रेणुका मातेची ओळख आहे.रेणुकामाता चे मंदिर आतापर्यंत घरातच होते. आता या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. रेणुकामाता मातेचे मंदिर म्हणजे कुलदेवता प्रसन्न करणाऱ्या तपस्वीची तपोभूमी होय.निजामशाहीच्या कालखंडात परधमीँय सतत हल्ले करुन हिंदूंचे मंदिर उद्ध्वस्त करत असत.त्यामुळे शहरातील अनेक मंदिर घरात बसून पूजा करावी लागत असे. शहरातील केशवराज वेटाळ येथील अतिप्राचीन असलेले श्री रेणूका मातेचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.शहरातील दोन देवीचे मंदिर आहे त्यात एक व दुसरे कालंका माता मंदिर (शिवाजी नगर) हे शहरातील व परिसरातील भाविकांचे सर्वश्रेष्ठ शक्तिपीठ आहे. भक्तांच्या नवसाला पावणारे ,भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे ग्रामदेवता म्हणून या देवीची ओळख आहे. नवरात्रोत्सवात आकोट नगर व तसेच आसपास परिसरातील असंख्य भाविक देवीच्या दर्शन घेण्यासाठी येतात. उत्साहात दररोज भजन, महिला भजनी मंडळ,इत्यादी कार्यक्रम होत असतात. यंदा प्रथमच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराचे बांधकाम सुरू आहे. नवरात्रोत्सव महिलांची मोठ्या संख्येने गदीँ होत आहे. मंदिराचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे.नवसाला पावणारी श्री रेणुका देवी अशी आख्यायिका आहे. असे सांगतात. यंदा मंदिरात महिला भजनी मंडळ, विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम सुरू आहे.. शहरात कै.नानासाहेब कंरडेची देवी म्हणून प्रसिद्ध आहे.आता मंदिराचे विश्वस्त म्हणून वेदशास्त्रसंपन्न महेश महाराज करंडे काम पाहत आहे.


