रितेशकुमार टीलावत
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडल,भगवान श्री परशुराम चौक खोलेश्वर खोलेश्वर तर्फे चतुर्थ नवरात्रित महिलांनी नवदुर्गेचे रूप धारण करून गरबा प्रस्तुत केला. ज्यात सौ.दीपा सिवाल-काली माता,सौ.निधि शर्मा-महालक्ष्मी माता, सौ.किरण शर्मा-लक्ष्मी माता,सौ.एकता बगरेट-चंद्रघंटा माता सौ.माधुरी शर्मा-अम्बा देवी,सौ.भावना शर्मा -बेगली माता,सौ.कोमल शर्मा- अन्नपूर्णा माता, प्रिया शर्मा-दुर्गा माता , सौ.मानसी जोशी- ब्रह्मचारिणी माता अशाप्रकारे विविध रूपात महिला नवदुर्गेचे नऊ रूप धारण केलेल्या दिसल्या. व कार्यक्रमाला यशस्वी केले. त्यात महिला मंडळ कार्यकारणी अध्यक्ष सौ. रविता शर्मा,सचिव श्रीमती सारिका शर्मा,सहसाचिव सौ.अर्चना शर्मा कोषाध्यक्ष – सौ. एकता बगरेट,उपाध्यक्ष – सौ. दीपा शिवाल,सह उपाध्यक्ष – सौ.विद्या सारडा,सौ.शीतल तिवारी सौ.रीना पवार,सौ.आशा बगरेट,सौ.ज्योति बगरेट, सौ.शीतल शर्मा,सौ.पूजा पवार,सौ.आशा साहू, सौ.गायत्री शर्मा,सौ. कल्पना शर्मा,सौ. सुनीता तिवारी,सौ. पूजा शर्मा, सौ.प्रीति शर्मा,सौ. शोभा तिवारी,सौ.ममता तिवारी, सौ.लता शर्मा,सौ.मीना शर्मा , आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी माजी अध्यक्ष स्वर्गीय श्री राजेश जोशी यांच्या अथक परिश्रमाला कधीच कार्यकर्ते विसरणार नाहीत अशी भावना येथे व्यक्त करण्यात आली. दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा नऊ दिवस शिवशक्ती माता मंदिर च्या समोर श्री परशुराम चौक येथे नवरात्रीचा उत्सव महिला मंडळातर्फे हर्षल असा साजरा करण्यात येतो . यात फक्त महिलांनाच प्रवेश असतो त्याचप्रमाणे दररोज पुरस्कार सुद्धा वितरित करण्यात येतात.