अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : सोशल मीडियाचा वापर आपण जपून केला पाहिजे. आपण वर्तमानपत्रांमध्ये बऱ्याचशा इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांच्या बातम्या ऐकल्या असतील आपल्यासोबत विविध प्रकारचे क्राईम हे इंटरनेटच्या माध्यमातून होत असतात. आजची चोरी ही डिजिटल साधनांच्या माध्यमातून होत आहे. डिजिटल माध्यमांचा वापर हा तर आवश्यक आहेच परंतु इंटरनेट आणि स्मार्ट फोन माध्यमांचं पुरेपूर ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे, नाहीतर आपली फसवणूक होऊ शकते हाच विचार घेऊन एमकेसीएल चे अधिकृत प्रशिक्षण केंद्र एज्युकेशनल कंप्यूटर आणि राष्ट्रीय सेवा योजना डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय पातुर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात सायबर क्राईम जागृती आणि सोशल मीडिया जागृती प्रोग्रामच आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थी अथवा नागरिकांना इंटरनेटवरून कोणकोणत्या प्रकारे आपली फसवणूक होऊ शकते. कोणत्या कोणत्या प्रकारे ब्लॅकमेल केले जाऊ शकते. तसेच इंटरनेट आणि स्मार्टफोनचे अती वापरामुळे आपल्या जीवनावर होणारे वाईट परिणाम अशा विविध गोष्टींवर मार्गदर्शन करण्यात आले.एमकेसीएलचे सोशल मीडिया अँड सायबर क्राईम एक्सपर्ट राहुल ताले यांनी सायबर क्राईम सुरक्षा, सोशल मीडिया माध्यमातून होणारे गुन्हे व सुरक्षा याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनंतर विद्यार्थ्यांना गहिले सरांनी जीवनात कसे यशस्वी व्हावे त्याबद्दल मार्गदर्शन केले. संस्थेचे संचालक दीपक राखोंडे सर यांनी कंप्युटर व स्मार्टफोनचा वापर आपल्या करिअरसाठी कसा करू शकतो या संबंधित मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एच. एन.सिन्हा महाविद्यालयाचे प्राचार्य किरण खंडारे होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.जेष्ठ पत्रकार देवानंद गहिले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाकरिता ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार देवानंद गहिले, ज्येष्ठ कवी कृष्णराव घाडगे, एन.एस. एस विभागाचे प्रमुख डॉ.रोनिल आहाळे , सांस्कृतिक समन्वयक दिपाली घोगरे, साने गुरुजी मंडळाचे अध्यक्ष युवाश्री विशाल राखोंडे, सागर राखोंडे, युवा पत्रकार अविनाश पोहरे तसेच एमकेसीएलचे सोशल मीडिया अंड सायबर क्राईम एक्सपर्ट श्री राहुल ताले , एज्युकेशन कम्प्युटर सेंटरचे संचालक दीपक राखोंडे, शुभम बोरकर, विठ्ठल घेघाटे तसेच महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.