जितेंद्र लखोटिया
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
तेल्हारा : ग्राम धोंडाआखर ता. तेल्हारा आदिवासी बहुल भागामध्ये सेवा पंधरवाडा एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत आदिवासी भव्य सांस्कृतिक मेळावा व दांडिया स्पर्धेचे आयोजन भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, आदिवासी विकास परिषद, जयकारा दांडिया मंडळ, यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा सेवा पंधरवाडा संयोजक माननीय आमदार श्री हरीश भाऊ पिंपळे हे होते. कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी अकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री प्रकाश भाऊ भारसाकळे हे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मेळघाटचे माजी आमदार मा. प्रभुदास भिलावेकर, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, आदिवासी प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे, गटविकास अधिकारी भारत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आतकड, आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष अजबराव उईके, जिल्हा परिषद सदस्य रमेश दूतोंडे, भाजपा जिल्हा चिटणीस राजेश रावणकर, गोपाल मोहोड, योगेश गोतमारे, हरिष पात्रीकर, मनमोहन व्यास,अनिल भारसाकळे, रमेश केदार, अशोक मावसे, नंदलालओमवाल, भाकलू मावसे, मुन्ना ठाकरे,प्रकाश मावसकर, ब्रिजेश गवते, मेतकर महाराज,राजेंद्र माहुलकर, संजय सोळंके, तसेच भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष देवा भारसाकळे व प्रसिद्धी प्रमुख विशाल भारसाकळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तसेच भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश पवार तसेच भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिनेश मावसे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडा, दुर्गामाता यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपले विचार प्रकट करतांनी संस्कृती जतन करण्याचे काम आदिवासी समाज प्रकर्षाने करत आहे. यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा असे आपल्या मनोगतात व्यक्त केले. तसेच यावेळी आदिवासी दांडिया नृत्य सादर करण्यात आले. परिसरातील हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनिल मावसे, चंदू बेठे , नंदलाल बेठे ,हरिलाल तोता ,कैलास बेठे, राजेश तोता, किशोर तोता, नामदेव तोता, ताराचंद बेठे, राम गोपाल दहीकर, रवीलाल तोता, नंदकुमार बेठे, दीपक बेठे, सुनील बेठे ,लखन बेठे ,रमेश मावसे, विशाल तायडे, श्रावण दहिकर, रोहित मावसे ,महादेव कोकळे, राजू मोरे, विश्राम भिलावेकर, सखाराम राऊत ,शोभाराम दहीकर, शंकर दहिकर, राजेश दहीकर ,अनिल चोंगळ बोदंर कारंडे ,गंगाराम मावसकर, सुनील काकडे, दिलीप गवते, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव भास्कर सर तर आभार प्रदर्शन दिनेश मावसे यांनी केले.