महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : येथील विवेकानंद महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.संगीता बांबोडे यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार-२०२२ नुकताच जाहीर झाला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.शैक्षणिक, कला व क्रीडा विभागात विविध स्तरावर यश संपादन करणाऱ्या महिला शिक्षकांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार दरवर्षी दिला जातो. यावर्षीच्या राज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराचे आयोजन कै. सौ. चंद्रभागाबाई भिका कंखरे प्रतिष्ठान शिरपूर जि. धुळे यांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर पुरस्काराकरिता क्रीडा क्षेत्रात जिल्हा व राज्यस्तरावर क्रीडा शिक्षिका,प्राध्यापिका व संघटक म्हणून खंबीरपणे काम बघणाऱ्या विवेकानंद कला व वाणिज्य महाविद्यालय भद्रावती च्या प्राध्यापिका कु. संगीता ऋषी बांबोडे यांची निवड करण्यात आली आहे. संगीता बांबोडे ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्व असून जिल्ह्याच्या व राज्याच्या विविध क्रीडा संघटनेत त्या कार्यरत आहे. विद्यापीठ व संघटनात्मक क्रीडा स्पर्धेत त्यांचे असंख्य खेळाडू सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त करत आहेत. सदर बाबीची दखल घेऊन त्यांची यावर्षीच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२२ करिता निवड करण्यात आली. सदर पुरस्कार दि.९ ऑक्टोबर रोजी श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर यांच्या हस्ते शिरपूर जिल्हा धुळे येथे प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराकरिता निवड झाल्याबद्दल प्रा. संगीता बांबोडे यांचे विवेकानंद ज्ञानपीठ ( कॉन्व्हेंट) वरोरा चे अध्यक्ष ॲड.मोरेश्वर टेमुर्डे, सचिव अमन टेमुर्डे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, प्राध्यापक वर्ग व इतर कर्मचारी, चंद्रपूर जिल्हा क्रीडा संघटनेचे डॉ. प्रेमचंद, डॉ. राकेश तिवारी, डॉ. दिलीप जयस्वाल, डॉ. अनिस खान, डॉ.चंद्रशेखर कुंभारे, डॉ. अनिता लोखंडे, डॉ. दिलीप बगडे, विजय लांबट, दिलीप मोडक, ॲड. मिलिंद रायपुरे, संतोष निंबाळकर, राजेश मत्ते, युवराज भारती, दिनेश गोंडे, विनोद कावठी, सुनील दैदावार, दुर्गराज रामटेके, योगेश करमनकर, गौतम देवगडे, प्रा.पूर्वा खेरकर, कू. वर्षां कोयचाडे यांनी अभिनंदन केले आहे.