मोहन चुन्ने
तालुका प्रतिनिधी लाखांदूर
लाखांदूर : वन्य प्राणी पिकांची नासाडी करून पीक भूईसपाट करतात म्हणून त्यांचे शिकारीचे हेतूने स्वतःचे शेतशिवारात सभोवार विदयुत करंट लावून ठेवणाऱ्या शेतकऱ्याचा त्याच जिवंत तारांचे स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना दि. 21सप्टेंबर रोजी सकाळी 8 चे सुमारास लाखांदूर तालुक्यातील मुरमाडी येथे घडली. नम्रदास किसन मेश्राम वय 52 रा. मुरमाडी ता. लाखांदूर जी. भंडारा असे मृतक इसमाचे नाव आहे. मृतक नम्रदासचे शेत जंगलाशेजारी दहेगाव रस्त्यावर असून जंगली स्वापद धान पिकांची नासाडी करतात म्हणून वन्य प्राण्यांचे शिकारीचे बहाण्याने अन्य साथीदारांचे सोबतीने शेतशिवारातील विदयुत खांबावरून बारीक लोखंडी अर्थिंग तारावरून दि. 20 सप्टेंबर रोजी रात्री शेताच्या सभोवती विदयुत करंट सोडून ठेवले. त्या रात्री खूप पाऊस आल्याने जमिनीत व धुऱ्यांवर दूरवर पर्येंत विदयुत करंट पोहचले. सकाळी आपण लावलेल्या विदयुत करंटच्या सापळ्यात किती वन्य प्राणी सापडले ह्या कुतूहलाने नम्रदास शेतशिवारात लावलेले विदयुत करंट पहायला शेतावर गेला. मात्र त्या वन्य प्राण्यांसाठी लावलेल्या विदयुत करंटच्या सापळ्यात स्वतःच लटकून मरण पावला. दुपारचे 1वाजेपर्यंत सदर इसम घरी न आल्याने शोध घेतला असता नम्रदास विदयुत करंटने शेतावरच मृत झाल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांची गर्दी झाली. सदर घटनेची तक्रार सायंकाळी उशिरा पर्यंत पोलिसात देण्यात आली दिघोरीचे पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली असून पुढील चौकशी सुरु आहे.
वन्य प्राण्यांचा हैदोस
लाखांदूर तालुका जंगलव्याप्त असून घनदाट जंगलामुळे इथे वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला आहे. जंगल परिसरातील शेतशिवारात वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी करतात. त्यामुळे त्यांना करंट लावून मारणे हाच एक पर्याय आहे का ?