सादिक शाह
सर्कल प्रतिनिधी रायपुर
रायपुर : एस टी ची खीळे व मानसाची हाडे खिळखिळे करून जिवघेणा ठरत असलेलल्या हातनी ते दुधा रस्ता त्वरीत दुरुस्त करण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला . रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खडयामुळे या मार्गा वरून जाणार्या वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे हा रोड ठिक ठिकानी उखडलेला आहे . रायपूर पेट्रोले पंपा जवळ असलेल्या नदीवरील पुल पूर्ण पणे खरडुन गेला असून मोठा खडा पडल्यामुळे वाहतूकीस धोकादायक ठरत आहे. या प्रमुख मार्गाच्या दुरुस्थी साठी संघटनेच्या वतीने चक्का जाम करण्यात आला. बांधकाम विभागाचे संबधीत अधिकारी घटणास्थळी आले असता आंदोलन करणार्यानी त्यांना घेराव घातला आणि रोड तसेच पुला बाबत असलेला समस्याचा पाढा वाचला आणि खडतर रस्त्याची दुरुस्ती त्वरीत करण्यात यावी. अन्यथा पूढे हे आंदोलन तिव्र करणात येईल असा इशारा ही देण्यात आला कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रायपूर पोलीसांनी चोख बंदोबस्थ ठेवला होता. आंदोलन कर्त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते निलेश राजपूत, सदा रमेश सिरसाट, नंदु बापु देशमुख, शमीम सौदागर, मसुद सौदागर व समस्त गावकरयांच्या उपस्थिती होती.










