सुमित सोनोने
तालुका प्रतिनिधी मूर्तिजापूर
मुर्तिजापूर : येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे ज्येष्ठ समाजसेविका वैजंताताई डोंगरदिवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गजानन बेलखेडे यांच्या पुढाकाराने व वैजंताताई डोंगरदिवे मित्र मंडळाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय तसेच महिला आधार गृह येथे ब्लॅंकेट व फळ बिस्कीट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात लक्ष्मीबाई देशमुख यांच्या मूर्तीचे पूजनाने करण्यात आली यावेळी उपस्थित आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी आपले विचार व्यक्त करताना स्वतःचे दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा या समाजाचे आपण काही देणे लागतो ही उदात्त भावना मनाची बाळगून शेकडो दीन दुःखी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे त्यांच्या निवाऱ्याकरिता रोजगाराकरिता मदत करणे तसेच गोरगरीब मुले मुलींच्या शिक्षणासाठी लग्नासाठी मदत करणे, परिसरातील जनतेच्या समस्याचे निवारण करण्याकरिता लोकप्रतिनिधींच्या दरबारी पाठपुरवठा करण्याचे नेहमीच सातत्याने प्रयत्न करत असतात त्यांचे कार्य लोकाभिमुख असून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो असे भावनिक विचार मांडले यावेळी प्रामुख्याने आमदार हरीशभाऊ पिंपळे ज्येष्ठ समाजसेविका वैजयंताताई डोंगरदिवे विष्णुभाऊ लोडम वैद्यकीय अधीक्षक डॉ.विलास सोनोने ,डॉ नेमाडे, डॉ.चव्हान, गजानन बेलखेडे, अनिल चावला, अनिता शिरसाट, कमलाकर गावंडे, सतीश गावंडे, कैलास महाजन, सुनील पवार, आनंद पवार, सतीश जामनीक, किरण शिरसाट, उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी सुपरवायझर नितीन देशमुख, विनोद चव्हाण, नरेंद्र मुगल, सेनापती सेवतकर पुंडलिक संगेले, विलास चहाकर, सुरक्षा कर्मचारी जानराव भगत ,रितू चीनप्पा व आपातकालीन पथकाचे सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन विष्णू लोडम आभार गजानन बेलखेडे यांनी मानले.