विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : सरकारने 2014 पासून स्वच्छता अभियान अंतर्गत हागणदारीमुक्त गावे करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक गावोगावी खेड्यापाड्यांमध्ये स्वच्छता अभियाना अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला स्वच्छालय यासाठी 12 हजार रुपये मध्ये शौचालयाचे बांधकाम ग्रामपंचायत च्या अंतर्गत करून दिले आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये स्वच्छता अभियानाचा फज्जा उडाला आहे. प्रत्येक ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणावर किंवा बस स्टॅन्ड समोर हागणदारी मुक्त चे बोर्ड प्रत्येक गावाला दिसतो परंतु गावातील अजूनही काही नागरिक त्याच बोर्डाच्या समोर हातात टमरेत घेऊन रोडच्या कडेला स्वच्छालयला बसताना दिसत आहेत. शंभर टक्के हागणदारी मुक्त गाव तर आहे का फक्त कागदावरतीच दिसते असाही प्रश्न निर्माण होत आहे.अशाच गावामध्ये कित्येक लोक रोडच्या कडेला स्वच्छालयाला बसताना दिसत आहे त्यामुळे संपूर्ण गावांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. असाच प्रकार पातुर नंदापूर परिसरामध्ये व गावामध्ये सुद्धा घडत आहे पातुर नंदापूर गावामध्ये गाव आपले सहर्ष स्वागत करीत आहे लाखो रुपये खर्च करून गावासमोर बोर्ड उभारली आहेत. आणि त्याच बोर्डाखाली सकाळच्या वेळेमध्ये बरेचसे नागरिक टमरेट घेऊन येणाऱ्या जाणाऱ्यांचे स्वच्छालय ल याला बसताना स्वागत करता वेळेस दिसतात.सोनखास वरून विद्यार्थी पातुर नंदापूर मध्ये शाळेत शिकण्यासाठी येत असतात त्यांना पायी प्रवास करावा लागतो. त्यात मुली सुद्धा असतात परंतु येताना त्याच रोडवर भरपूर प्रमाणात आपले टमरेट हातात घेऊन रोडच्या कडेला नागरिक स्वच्छालयाला बसताना दिसतात शंभर टक्के गाव हागणदारीमुक्त असल्यानंतरही अशा लोकांना ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला तेही लोक उघड्यावर शौचाला बसतात तरीही त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही आपले गाव स्वच्छ करावे ग्रामपंचायत स्तरावर कार्य करण्याचे काम असून सुद्धा कोणतीच यंत्रणा याला आळा घालण्यात असक्षम झाली आहे.
गुड मॉर्निंग पथकाची स्थापना सुद्धा करण्यात आली होती परंतु गुड मॉर्निंग पथकाचा सुद्धा फज्जा उडाला आहे स्वच्छता अभियान अंतर्गत लाखो रुपये खर्च करून सुद्धा गाव खेड्यामध्ये त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आणि घाणीचे साम्राज्य निर्माण होत असल्यामुळे डेंगू चे आजार मलेरिया, किडनीच्या आजार, श्वासाचे आजार अशा कित्येक भयानक रोगांचा सामना गाव खेड्यामध्ये नागरिकांना करावा लागत आहे शासनाने दंडात्मक कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
स्वच्छता अभियान अंतर्गत शासनाने कठोर पाऊल उचलण्याची आज गरज भासत आहे जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत सभ्य नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.











