वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव : यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेली शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ही आज राळेगाव तालुक्यातील झाडगाव दापुरी कासार व चहांद या गावातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले व त्यांना शासनाकडून निधी मिळवून देऊ असा आश्वासनही दिलं. शेतकरी पुत्र स्वर्गीय मयूर बंडू संगेवार व तसेच चहांद येथील शेतकरी पुत्र श्याम व राहुल ज्ञानेश्वर धोबे यांच्या घरी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली.
तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, विश्वास नांदेकर, संतोष ढवळे, तालुका प्रमुख विनोद काकडे, महिला तालुकाप्रमुख वर्षा मोघे,उप तालुका प्रमुख प्रशांत वारेकर, सुरेंद्र भटकर, शंकर गायधने, युवासेना तालुका प्रमुख अमोल राऊत, युवासेना उप तालुका प्रमुख वृषभ दरोडे, अखिल निखाडे ,गोपाल मडावी, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार डॉक्टर रवींद्र गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.