मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : शैक्षणिक क्षेत्रातील एकमेव डिजिटल दैनिक म्हणून महाराष्ट्र भर प्रसिद्ध असणाऱ्या रयतेचा कैवारी दैनिका द्वारे दिला जाणाऱ्या शिक्षण भूषण पुरस्काराचे दिनांक 18 सप्टेंबर रोजी डी डी विसपुते महाविद्यालय पनवेल येथे दिमाखदार सोहळ्यात वितरण करण्यात आले.
यावर्षीच्या या पुरस्कारासाठी जिल्हा परिषद कन्या शाळा दानापुर येथे कार्यरत असलेले इतिहासाचे अभ्यासक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे संस्कार भारती संघटनेचे अध्यक्ष श्री सचिन ठोमरे सर यांची निवड करण्यात आली होती. सदर पुरस्काराचे वितरण दिमाखदार सोहळ्यात पनवेल येथे संपन्न झाले.या कार्यक्रमाला आदर्श शिक्षण समूहाचे अध्यक्ष धनराज विसपुते,कोकण विभाग शिक्षक सेना अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षण परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे ,भाजपा शिक्षक आघाडी सहसंयोजक अनिल बोरणारे, शिक्षण उपसंचालक मनीषाताई पवार, रयतेचा कैवारीचे मुख्य संपादक शाहू संभाजी, भारती रायगड माझी पालकमंत्री आदिती ताई तटकरे उपस्थित होते.