रितेश कुमार टीलावत
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड : जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय हिवरखेड येथे डिजिटल क्लास रूमचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. डॉ. गजानन नारे संचालक प्रभात किड्स अकोला यांचे शुभ हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. सौ. सुलभाताई रमेशराव दुतोंडे सदस्या जिल्हा परिषद अकोला होत्या. मा.श्री.डॉ. राजेंद्रजी सोनोने अकोला व मा. सौ.डॉ. अंजलीताई राजेन्द्रजी सोनोने यांच्या सौजन्याने प्राप्त दोन डिजिटल क्लासरूम चे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. उद्घाटक डॉ.गजानन नारे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांच्या कामगिरीबाबत कौतुक केले. व कुठल्याही प्रकारचा उपक्रमास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. गावचे सरपंच श्री रमेशराव दुतोंडे यांनी आपल्या मनोगतातून जिल्हा परिषद व ग्रामपंचायत कडून शाळेसाठी पूर्ण केलेली विकासकामे सांगितली, शिवाय उर्वरित गरजेची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. गावचे सुपुत्र डॉ. राजेंद्र सोनीने यांनी शाळेसाठी केलेले काम असेच अविरतपणे सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय हिवरखेड चे मुख्याध्यापक श्री विष्णू मिसाळ यांनी शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी लोकसहभागातून लोकवर्गणी करून शाळेच्या शाळा सुधार खात्यात रक्कम टाकावी. तसेच कोणत्याही स्वरूपात देणगी द्यावी. आणि माजी विद्यार्थ्यांनी एक समन्वय समिती स्थापन करून शाळेच्या विकासात सहभाग घ्यावा असे आवाहन या प्रसंगी केले. उर्दू विभागाचे प्रमुख श्री.सय्यद कमर अली सर यांनी शाळेचे प्रगती बद्दल मान्यवरांना सांगितले तसेच शाळेला हवी असलेली भौतिक सुविधा सुविधाची मागणी केली. हिवरखेड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री मनीष गिऱ्हे यांनी शाळेचा विकास उत्तमप्रकारे होत असल्याबद्दल सांगितले. सदर कार्यक्रमांमध्ये पंचायत समिती सदस्या मा. सौ. गोकुळताई महेंद्रजी भोपळे, गावचे प्रभारी सरपंच मा. श्री रमेशराव दुतोंडे , ग्राम पंचायत हिवरखेडचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी ,पालक वर्ग, नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.