कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : राज्य सरकार अधिनस्त सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दि. 21 सप्टेंबर रोजी स्थानिक यशवंत रंग मंदिर मैदानावरून पेन्शन संदेश बाईक रॅलीचे करण्यात आले आहे. नाशिक येथे पार पडलेल्या राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या कार्येकारिणीत ठरल्यानुसार एनपीएस विरोधात नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत संपूर्ण राज्यात संपूर्ण कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे उपविभागीय अधिकारी कार्यालयातील प्रस्तुतकार-1 दिलीप कोलेवाड यांनी कळविले आहे. सदर पेन्शन संदेश बाईक रॅलीमध्ये महसूल विभाग,वन विभाग,आरोग्य विभाग,पंचायत समिती,तालुका कृषी अधिकारी कार्यालय,शिक्षण विभाग,उप कोषागार अधिकारी कार्यालय,नगरपालिका,दुय्यम निबंधक कार्यालय आदी कार्यालयातील सर्व कर्मचारी सहभागी होणार आहेत.
दि.21 सप्टेंबर रोजी पेन्शन संदेश बाईक रॅलीचे आयोजन सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. सदर पेन्शन संदेश बाईक रॅलीविषयीचे निवेदन देतेवेळी दिलीप कोलेवाड,गोपाल जिरोनकर,रवी घड्याळे,आशिष वानखेडे,जीवन वडते, प्रदीप मोहटे,कैलास चांडक,रंगराव चव्हाण,उमेश राठोड, श्रीमती कांचन राठोड,सौ,संगीता थेर, ज्ञानेश्वर जाधव, पावडे आदी सर्व विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.