कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी अकोट
अकोट : तालुका मध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत होणाऱ्या पावसामुळे शेत शिवारात असणारी पिके कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग, पिकाचे नुकसान झाले आहे.तसेच हवामान अंदाज नुसार अजूनही बरेच दिवस पाऊस पडण्याची शक्यता दर्शविण्यात आलेली आहे.अशावेळी आज हातात आलेली पिके ही हातातून निघून जाणार यात काही शंका नाही आपल्या जिल्ह्यातील पावसाची सरासरी प्रमाण ओलांडली आहे. अशावेळी संबंधित विभागाने झालेल्या नुकसानीचा सर्वे करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. विमा कंपन्यांकडून विमा काढला, त्यांनीसुद्धा पंचनामे करून पूर्णता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. शेती मधील नुकसान पाहता अकोट तालुक्यातील ओला दुष्काळ सरकारने जाहीर करावा.कॉग्रेस चे जेष्ठ जिल्हा कार्याध्यक्ष महेश गणगणे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष शिवराम डिक्कर यांनी दिले, हे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन विद्यार्थी काँग्रेसतर्फे मागणी करण्यात आली. उपस्थित विद्यार्थी कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष शिवराम डिक्कर, शुभम म्हैसने,रोशन चिंचोलकर, ऋत्विक सोनटक्के, प्रभाकर म्हैसने, रोशन मोरे, विनोद डिक्कर,कपिल म्हैसने, अभिषेक डिक्कर,ज्ञानेश्वर खोंड स्वप्नील डोबाळे,शिवा वानखडे, गोपाल वानखडे, अक्षय पोटदुखे, निलेश गावंडे, सुमित ठाकरे. कार्यकर्ते उपस्थित होते.