कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी अकोट
अकोट : अखिल भारतीय छावा संघटना उपजिल्हाप्रमुख पदी सचिन नागापुरे यांची आज निवड करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील सांगळुद या ठिकाणी आयोजित छावा संघटनेच्या मेळाव्यात रणजित पाटील काळे (अ. भा. छावा संघटना जिल्हाध्यक्ष) यांच्या हस्ते सचिन नागापूरे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी छावा संघटनेचे अकोट-तेल्हारा विभागातील संतोष पाचपोहे, अमोल दातिर, संतोष कुरदाने, अक्षय नागापुरे, मिलिंद तेलगोटे, अक्षय तेलगोटे, शेखर नागापुरे, मंगेश लोखंडे, विनोद मते, आदित्य दातिर, ओम भगत, शिवा अरबट, अमोल गोमासे, आदेश भेले, रामेश्वर लिल्हारे, नितिन हेन्द, सतिष गोमासे, शंतनु गोरले, रूपेश कनसरे, पिन्टु वाघमारे, रोशन धामळे आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सचिन नागापूरे यांनी या पूर्वी छावा संघटनेच्या तालुकाध्यक्ष, तद्नंतर अकोट-तेल्हारा विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता उपजिल्हाप्रमुख पदी त्यांची नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.