कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : येथील विश्रामगृहात केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती शिवसेना, संभाजी ब्रिगेड ,व मराठा संघाच्या वतीने करण्यात आली. या महाराष्ट्राला प्रबोधनाची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. विविध कालखंडात महापुरुषांनी प्रबोधन करून जनजागृती केली आहे. त्यामधे विसाव्या शतकात केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे नाव अतिशय सन्मानाने घेतले जाते. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा १७ सप्टेंबर जन्मदिवस आहे. यावर्षी पासून हा दिवस शिवसेना व संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोक प्रबोधन दिन म्हणून पुसद विश्रामगृह येथे संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, व शिवसेनेच्या विद्यमानाने साजरा करण्यात येईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर भाऊ देशमुख संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य, यांनी केले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिगांबर जगताप सर होते तसेच मंचावर उपस्थित मोहन विश्वकर्मा शिवसेना,रंगराव काळे,संतोष दरणे,प्रभाकर टेटर,ता.अध्यक्ष मराठा सेवा संघ हे उपस्थित होते प्रबोधन करण्यासाठी प्रा. यशवंत देशमुख त होते या कार्यक्रमात सर्वांनी आपले विचार व्यक्त केले प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जीवनातील वेगवेगळ्या पहलूवर प्राध्यापक देशमुख यांनी प्रबोधन केले तर सुधीर देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेना, संभाजी ब्रिगेड, व मराठा सेवा संघाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी.प्रविण कदम संभाजी ब्रिगेड ता.अध्यक्ष,करु पानपट्टे, गोविंद कोरडे, प्रशांतराजु महाजन, नरवाडे संकेत डोईफोडे अर्जुन राठोड, बबलू पाचपुते, शिवाजी कदम,हरिभाऊ ठाकरे, हरगोविंद कदम, हर्षद साकला युवासेना ता.प्रमुख इत्यादींनी परिश्रम घेतले.











