जितेंद्र लाखोटिया
ग्रामीण प्रतिनिधी, हिवरखेड
तेल्हारा : दानापूर येथिल शेतमजूर असलेले राजेश पुंडलीक घायल यांचा मुलगा ऋषीकेश घायल याने औद्योगिक प्रशिकण (आय, टी, आय ) मध्ये राज्यात पहिला येऊन दानापूर गावाच्या नावात मानाचा तुरा रोवला आहे.नुकत्याच महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या सन 2022 च्या परीक्षेत दानापूर येथील शेतमजूर असलेले राजेश घायल यांच्या मुलगा ऋषीकेश घायल 90.33 टक्के घेऊन महाराष्ट्र राज्यातून पहिला येऊन औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोट च्या नावात भर टाकली आहे. ऋषिकेश ने ट्रॅक्टर मेकॅनिकल हा ट्रेड या औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अकोट येथे घेतला होता. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोट च्या वतीने ऋषिकेश चा महाराष्ट्र राज्यातून पहिला आला त्याबद्दल ऋषीकेश भव्य सत्कार समारंभ घेण्यात आला. यावेळी ऋषीकेश ला सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अकोटचे प्राचार्य तथा सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ऋषिकेशने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.











