महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : भारतातील सर्वात पहिला सिऱ्यामीक प्रकल्प असलेल्या भद्रावती शहरातील सुप्रसिद्ध अशा ग्रामोदय संघाला चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आपल्या कुटूंबासोबत नुकतीच सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांनी ग्रामोदय संघात निर्मीत होत असलेल्या सिऱ्यामीकच्या कलाकुसरीच्या दर्जेदार व सुरेख वस्तुंची पाहणी केली. या वस्तु देशातील मोठमोठ्या महानगरांमधुन लावण्यात येत असलेल्या प्रदर्शनीतून विकल्या जातात. येथे अगदी एक हजारापासून तर तर चाळीस ते पन्नास हजार रुपया पर्यंतच्या कलाकुसरीच्या वस्तुंची निर्मिती केल्या जाते. तसेच प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिका-यांनी ग्रामोदय संघाला जिल्हा प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल असे सांगितले. यावेळी तहसीलदार अनिकेत सोनवणे, ग्रामोदय संघाचे अध्यक्ष जितेंद्रकुमार चौधरी, उपाध्यक्ष व्ही.सी.श्रीवास्तव, सचिव अय्युब हुसेन, प्रशिक्षक रमेश गाडेकर आणि ग्रामोदय संघाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील धार्मिक स्थळांनाही भेट दिली.











