जितेंद्र लाखोटीया
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
हिवरखेड : येथील पांडुरग सस्थांन विठ्ठल रुखमाई मंदिर मार्च 2019 ला मंदिराचे कळसा रोहन झाले. कोरोनाच्या प्रभावा मुळे लोकवर्गनी व मंदिराचे मंगल कार्यालया चे बांधकाम,छपाईचे काम बंद होते. मंदिराचे मंगल कार्यालयाचे उत्पन्न व येणारे भाडे, लोकवर्गणी न झाल्यामुळे संस्थांचे सर्व काम ठप्प झाले होते. आता मंदीराचे सर्व पुजा वीधी,ऊत्सव नियमीत सूरु झाले आहे. मंगल कार्यालयाची दर्शनी भागाची छपाई चालू असताना मंदीरावर सुशोभित विठोबाचा लोगो,गजानन महाराज मंदीरावरील वारकर्याची निषानी व मृंदग, वीना, टाळ यांचा लोगो चा पुर्ण खर्च दानदाते भाऊराव पुंडलिक वानखडे यांनी वामन जंयती व भागवती ऐकादशी पर्वनीपर्वावर 10,111रुपयाचा धनादेश वीठ्ठल मंदीर समीतीचे सचीव सत्यदेव गीर्हे, प्रकाश बोंबटकार यांना दिला. यावेळी मदिराचे सोनाजी माहोकार, भाऊदेव राऊत, मंदिराचे पुजारी तायडे महाराज, हभप विठ्ठल महाराज तेल्हारकर व वारकरी संप्रदायाचे वारकरी संप्रदाय परिवार यांची उपस्थिती होती. तसेच इतरही बांधकामासाठी दानदात्यानी पुढे यावे असे आव्हान पांडुरग सस्थान विठ्ठल रुखमाई मंदीर समीतिकडून करण्यात आले आहे.