चंद्रकांत श्रीकोंडवार
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळण्याच्या दृष्टिने स्प्रिंग डेल शाळेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात खासदार मा. सुनिल जी मेंढे यांनी बैठकीत उपस्थित युवकांशी संवाद साधला. “उद्धरावा स्वये आत्मा!’ ही सनातन भारतीय दृष्टी आहे. आपल्या उद्धारासाठी आणखी कोणीतरी कुठून तरी येतील, असा विचार मुळीच करू नका”, असे वक्तव्य खासदार मा.सुनिल जी मेंढे यांनी केले पुढे ते म्हणाले, “भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात जास्तीजास्त उद्योजक व्हावे या प्रामाणिक इच्छेने तत्परतेने मी कार्य करीत आहे”. “मी स्वतः एक उद्योजक आहे. मेहनतीच्या जोरावर कोणताही उद्योग 100% यशस्वी होतो. मी स्वतः 4 ते 5 उद्योग केले आहेत”. “व्यवसाय म्हणजे सरकारी नोकरी नाही हे नेहमी लक्षात ठेवावे. आज मोठया प्रमाणात अत्याधुनिक पद्धतीने कृषी आधारित प्रकल्प आहेत. सबसिडी चा विचार न करता एक उद्योजक बाणा जपून व्यवसायाला सुरवात करा. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत त्याचा लाभ घ्या”. “माझ्या लोकसभा क्षेत्रात जास्तीत जास्त उद्योजक निर्माण व्हावे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी मी नेहमी तत्पर आहे”. “सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे दृष्टिने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुधारीत बीज भांडवल योजना, जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत असलेल्या कर्जाच्या योजना, उद्योजकता विकास प्रशिक्षण, वन आधारित उद्योग, कृषी आधारित उद्योग कार्यक्रम आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविले जातात. जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांना उद्योजकता विकास आणि तांत्रिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगाराकरीता प्रवृत्त करणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. “कुठे अडचण असल्यास माझ्या कार्यालयात आपण संपर्क साधू शकता” असे खासदार मा. सुनिल जी मेंढे यांनी बैठकीत युवकांना आव्हान केले. याप्रसंगी मा. कैलासजी मारबते जिल्हा मत्स्य अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक मा.हेमंतजी बदर, KVIC चे भंडारा जिल्हा समन्वयक मा.डॉ.निशा सोनेकर मॅडम, KVIC गोंदिया जिल्हा समन्वयक मा. भावेशजी साहारे, उमेद चे जिल्हा समन्वयक मा.गौरवजी तुरकर यांनी आपापल्या विभागाच्या योजनांची व कार्याची माहिती दिली. या बैठकीला प्रामुख्याने मा.अनिलजी मेंढे, मा.उपसभापती प्रशांतजी खोब्रागडे, मा.विनोदजी बांते, मा.तुषारजी काळबांधे( जिल्हा संयोजक उद्योग आघाडी), मा.मोहनजी सुरकर, मा.अनुप ढोके, मा.बंडू बनकर, आणि मोठ्या प्रमाणावर युवावर्ग उपस्थित होते.