जितेंद्र लाखोटीया
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
तेल्हारा : सततच्या पावसामुळे क्षेत्र जलमय होऊन ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे व ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढलेला आहे त्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर विमा कंपनीकडे ऑनलाइन किंवा ऑफ लाइन तक्रार दाखल करावी असे आवाहन मिलिंद वानखेडे तालुका कृषी अधिकारी तेल्हारा यांनी केले आहे. तेल्हारा तालुक्यामध्ये गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्यामुळे अनेक भागातील पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हाता तोंडाशी आलेला घास निघून जाण्याची शक्यता असल्याने व अनेक भागातील शेतपिकांचे नुकसान झाले असल्यामुळे संबंधित यंत्रणेने नुकसानग्रस्त भागाचा सर्वे करून नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत असतानाच तेल्हारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांनी सततच्या पावसामुळे क्षेत्र जलमय होऊन ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे व ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढलेला आहे. त्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर विमा कंपनीकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन तक्रार दाखल करावी असे आवाहन शेतकरी बांधवांना केले आहे.