देवेंद्र बिसेन
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
गोंदिया : स्थानिक प्रोग्रेसिव्ह शाळेत योगा शिकवित असताना एका विद्यार्थ्यांला शिक्षकाने शैक्षणिक शिक्षा केल्यामुळे दोन शिक्षकांना अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. त्यासाठी आरटीई फाउंडेशन व वेस्टाच्या वतीने पोलिस निरीक्षकांना निवेदन देवून अँट्रासिटी अंतर्गत दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रोग्रेसिव्ह शाळेत योगा शिकवित असताना शिक्षकाकडून एका विद्याथ्यार्ला मारहाण करण्यात आली. हा प्रकार निंदनिय आहे. पण शिक्षकाने शैक्षणिक शिक्षा केली. यामुळे दोन शिक्षकांना अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. त्यामुळे आरटीई फांऊडेशन व वेस्टाच्या वतीने पोलिस निरीक्षक यांना निवेदन देवून अँट्रासिटीचा गुन्हा मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना आरटीई जिल्हाध्यक्ष प्रा.आर.डी.कटरे, जिल्हा सचिव सुनील आवळे, संजयकुमार हेमणे, वाय.टी.कटरे, प्रशांत लील्हारे, प्रकाश पंचभाई, सतीश बन्सोड, मुकेश अग्रवाल, गजेंद्र फंडे, नीरज कटकवार, अजय पालीवाल, प्रफुल भालेराव, दिलीप जैन, सीताराम अग्रवाल, डॉ.चरणसिंग जुनेजा आदि पदाधिकारी उपस्थित होते.


