सुमित सोनोने
तालुका प्रतिनिधी, मुर्तिजापूर
मुर्तिजापूर : सद्यास्तीथ गूराना लम्पी या त्वचेच्या आजाराची लागण होत असून या पासून गूरे दगावन्याचा धोका देखील असल्या कारनाने गूरे पाळनारे शेतकरी मजूर कामगार याच्यामंध्येभीतीचे वातावरण आहे.ग्रामीण भागात गूराढोराची संख्या जास्त असल्यामूळे या आजाराचा प्रादूर्भाव वाढू नये या करीता गावोगावी लसीकरण केल्या जात आहे.मुर्तिजापूर तालूक्यातील हातगाव येथे लसीकरण मोहीम राबवून घरोघरी जाऊण लंम्पी आजार प्रतीबंधक लस देऊण 360 गूराचे लसीकरण करण्यात आले.गावातील गोठ्याची फवारणी ग्रा.प. मार्फत करण्यात यावी.अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने होत आहे.दिवसेंदिवस लम्पी आजार वाढत आहे.या रोगावर प्रतीबंध घालन्यासाठी गोट पाॅक्स लसीकरण तसेच गोठ्यामध्ये जंतूनाशक फवारणी करणे गरजेचे आहे.लसीकरनासाठी मूर्तिजापूर येथील पशूवैधकीय अधीकारी डाॅ.इखार डाॅ मूघल. डाॅ राठोड .डाॅ बनारसे.डाॅ बोयट चाऊस यांनी जनावराना लसीकरण केले.