अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : साहित्य कृतीतून समाज मने जोडणारा व समाज जीवनाच्या व्यथा मांडणारा ‘लांबडीर फुल’ हस्तलिखित अंक असल्याचे मत बंजारा साहित्यिक डॉ शांतीलाल चव्हाण यांनी यावेळी बोलतानी व्यक्त केले.चेलका तांडा येथील नवोदित कवी तु का ज्युनियर कॉलेज पातूरचा विध्यार्थी ऋषिकेश मूलचंद राठोड यांनी संपादन केलेल्या ‘लांबडीर फुल’हस्तलिखित अंकाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते.अंकामध्ये समाजातील नामवंत साहित्यिकांचे लेख कथा कविता आणि बंजारा लोकसाहित्याचा समावेश करण्यात आले आहे.यावेळी डॉ कृष्णा जाधव प्रा डी जे राठोड मनिषा चव्हाण वैभव जाधव मनोज राठोड आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन महेश राठोड यांनी केले तर आभार संदीप राठोड यांनी मानले.