अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान भिमनगर बाळापूर पातूर येथे विजयादशमी ला होणाऱ्या सभेच्या नियंत्रण समितीची तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा युवक आघाडी तर्फे सत्कार करण्यात आला.अकोला जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती आकाश सिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्मचक्र प्रवर्तन मिरणूक नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील विविध गावातील युवक उपस्थित होते.यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. धर्माळ, जिल्हा परिषद सदस्य सुनील फाटकर,दिनेश गवई चंद्रकांत तायडे, मनोज गवई, उपसभापती सौ.अर्चनाताई डाबेराव,अनिल राठोड, सुमेध हातोले,उमेश गवई,शरद सुरवाडे,विनय दाभाडे, बालूभाऊ सुरवाडे, संतोष इंगळे, नागेश तेलगोटे यांच्यासह तालुक्यातील युवक व वंचित बहुजन आघाडीचे आजी, माजी पदाधिकारी,भारिप बहुजन महासंघ, सम्यक विद्यार्थी आंदोलन तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.