जितेंद्र लाखोटीया
ग्रामीण प्रतिनिधी, हिवरखेड
हिवरखेड :भारतीय संस्कृती व सांस्कृतिक धरोवर जपण्यामध्ये अग्रगण्य असणाऱ्या सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे यावर्षी आगळा वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता.
गणेशोत्सवामध्ये रेड हाऊस तर्फे चित्रकला स्पर्धा, तर पिंक हाऊस तर्फे “वन ॲक्ट प्ले” स्पर्धा, ग्रीन हाऊस तर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले होते. ऑरेंज हाऊस तर्फे बचाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होत. तसेच कार्यक्रमाचा आयोजन इयत्ता नवव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते करता वर्ग शिक्षिका बाजारे मॅडम व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतलेले होते. कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे दररोज प्रत्येक वर्गाची आरती सकाळी आणि संध्या काळी ठेवण्यात आलेली होती व यासाठी विद्यार्थी स्वतःच्या हाताने घरून प्रसाद बनवून आणायचे, हराळ त्याचबरोबर हार आणायचे व शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते. त्यामधील नर्सरी ते इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना महाप्रसाद देण्यात आला. सर्वात शेवटच्या दिवशी ढोल ताशाच्या मदतीने गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आलेली होती व ग्राम पंचायत तर्फे करण्यात आलेल्या तळ्यात गणपतीचे विसर्जन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत तिवारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.