साईनाथ दुर्गम
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
सिरोंचा : मुसळधार पावसामुळे पुसुकपली येतिल जिलेडा नाल्याचे पाणी भरून वाहल्याने पुलवरच्या डांबरीकरण सहित रस्ता उकढुन गेला . शासन लक्ष देऊन त्वरित दुरुस्त करावी जेणेकरून लोकांचे जीव वाचेल अशी नागरिकांची मागणी होत आहे . मुरुम पूर्णता वाहून गेल्याने पुसुकपली , नेमडा , टेकडा ताला , जाफ्राबाद , मोकेला असे पाच गावचे लोक याच रस्त्याने प्रवास करतात . यापूर्वी झालेले अतिवृष्टीमुळे निर्माण झालेला पुरामुळे पंधरा हा रस्ता बंद होता आणि आता प्रामुख्याने हा रस्ता कंबालपेटा ते टेकडा ५ कि मी अंतर च्या हा रस्ताकडे कोणीच लक्ष देत नसून ५ किमी अंतर रास्ता जाण्यासाठी कमीत कमी अर्धा एक तास लागत आहे . पूर्णता खड्डे खड्डे पडले आहे . या रस्ताकडे प्रशासन व लोक प्रतिनिधी पुसुकपली जवळील जिलेडा नालावरील पुलाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या जिलेडा नाल्यावर नविन पुलाची निर्माण करावी तसेच टेकडा ते कंबालपेटा हा मार्ग सिरोंचा ते अहेरी 353 C क्रमाकाचा राष्टीय महामार्गला जोडनारा मार्ग असुन ह्या मार्ग अति लोडिंगच्या वाहतुकीने रस्त्यामध्ये अनेक ठिकानी मोठे मोठे खड्डे निर्माण झाला आहे टेकडा येतुन सिरोंचा प्रवास करण्यासाठी नागरीकानी जिवघेण्या प्रवास करावा लागत आहेया खड्डा जवळ खड्डा असल्यामुळे वाहन चालकाला खड्डामध्ये अंदाज येत नाही परीणामी अपघाताची शक्यता वाढत आहेत.त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे टेकडा ते कंबालपेठा दरम्यान असलेला मार्ग लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास यावे या परीसरातील नागरिकांनी मागणी केली होती. नागरिकांचा मागणीची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ता सुधाकर पेद्दी यांनी गावकऱ्यांच्या मदतीने या मार्गावरून तात्पुरती जाण्या येण्या साठी दुरुस्ती केली आहे.