अविनाश पोहरे
ब्युरो चिफ अकोला
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अकोला संलग्नीत कृषी महाविद्यालय रिसोड येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम व कृषी औद्योगिक जोड २०२२-२३ या कार्यक्रमांतर्गंत शेतकऱ्यांना आपल्या जिवाल इजा होउ नये म्हणुन व्यवस्थित फवारणी कशी केली पाहिजे तसेच फवारणीचे अवजार कशे हाताळले पाहिजे त्याच् बरोबर तण आटोक्यात आणण्यासाठी ताननाशक फवारणी बद्दल मार्गदर्शन केले विद्यार्थी सुजित इंगळे , प्रविण इंगळे, ओंकार इंगळे, पंकज सोळंके, अनिकेत पुरी उपस्थित होते.या साठी कृषी महाविद्यालय रिसोड चे प्राचार्य डॉ. आशीष अप्तुरकर, श्री. आर. एस. डवरे , रावे प्रमुख प्रा. डी. डी. मसुडकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. वाय. सरनाईक विषय विशेष तज्ञ प्रा. डी. टी. बोरकर , प्रा. शेख इरफान यांचे मार्गदर्शन लाभले.