अविनाश पोहरे
ब्युरो चिफ अकोला
पातुर : डॉ. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात बी. एस सी. प्रथम वर्ष वर्षाच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ 29 ऑगस्ट 2022 रोजी सोमवार ला संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.किरण. एस. खंडारे हे होते. विचार पिठावर ग्रंथालय प्रमुख प्रा.अतुल विखे, महाविद्यालयीन आय. क्यू. ए.सी. व विज्ञान विभाग समन्वयक डॉ.संजय खांदेल, सांस्कृतिक समन्वयीका डॉ.दिपाली घोगरे,विज्ञान विभागप्रमुख प्रा.विजया साखरे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतीमा पुजन व दिपप्रज्वलन करुन झाली याप्रसंगी कु.आरती सरप या विद्यार्थीनीने स्वागत गीत सादर केले.त्यानंतर विद्यापीठ गीतानंतर कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्रा. डॉ. संजय खांदेल, यांनी केले.याप्रसंगी उपस्थित प्राध्यापक मंडळींनी आपल्या अध्यापन विषयाचे महत्त्व प्रतिपादित केले. प्राचार्य डॉ. किरण.एस.खंडारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी पूरक उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांचा परिचय करून दिला. तसेच विद्यार्थ्यांनी नियमित तासिकाना उपस्थित राहून ज्ञान संपादावे तसेच शैक्षणिक मूल्यांबरोबर नैतिक मूल्य जोपासून आदर्श नागरिक निर्माण व्हावा असा आशावाद व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया धाडसे या विद्यार्थ्यीनी ने तर आभार प्रदर्शन हर्षदा थोरात या विद्यार्थ्यीनी ने केले.या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. याप्रसंगी संपुर्ण विज्ञान विभाग, सर्व प्राध्यापक बंधू व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.