मोहन चुन्ने
तालुका प्रतिनिधी लाखांदूर
लाखांदूर : वन परिक्षेत्राअंतर्गत मंगळवार दि. 13सप्टेंबर 2022रोजी लाखांदूर तालुक्यातील विविध 9 शाळा महाविद्यालयामध्ये वनकर्मचारी व अधिकारी यांचे मार्फत चित्ता या वन्यप्राण्याबद्दल जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. सन 1952साली जंगलाची शान असलेला चित्ता हा वन्यप्राणी भारतामधून नामशेष झाला होता. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 28जानेवारी 2020मध्ये केंद्र शासनास चित्ता वन्यप्राणी भारतात पुनः स्थापित करण्याची परवानगी दिली. त्यानुसार केंद्र सरकारच्या सहकार्याने मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ता या वन्यप्राण्यांचे 17सप्टेंबर रोजी आगमन होणार आहे. वन्यजीवांच्या अन्नसाखळीतील चित्त्याचे महत्व तसेच चित्त्याच्या अधिवासाची ओळख विद्यार्थाना व्हावी या महत्वाकांक्षी भूमिकेतून लाखांदूर वनपरिक्षेत्रात येणाऱ्या शाळांमध्ये विध्यार्त्यांना जनजागृतीपर कार्यक्रमातून चित्त्याबद्दल माहिती देण्यात आली. जि. प. प्रा. शाळा आसोला जि. प. प्रा. शाळा पिंपळगाव /को. पंचशील प्रा. शाळा पिंपळगाव जि. प. शाळा कोच्ची, दांडेगाव, कन्हाळगाव, दिघोरी, मुर्झा, दहेगाव, अशा एकूण 9 शाळेअंतर्गत 940विध्यार्थानी सहभाग नोंदविला होता. वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांचे मार्गदर्शनात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शालेय शिक्षकवृंद वन कर्मचारी अधिकारी व विध्यार्थी उपस्थित होते.

