अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर – शिर्ला बुद्धभूमी येथील पूज्य भन्ते अश्वजीत यांचे सोमवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्यावर भिक्खू संघाचे उपस्थितीत दुपारी 4 वाजता शिर्ला बुद्धभूमी परिसर येथे अंत्यविधी करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणाहून असंख्य जनसमुदाय उपस्थित होता. असंख्य समाज बांधवांनी त्यांना आदरांजली वाहिली.