सतीश मवाळ
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
मेहकर : हिवरा आश्रम येथील रहिवासी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील सुप्रसिद्ध महीला सर्पमित्र वनिता बोराडे यांनी पर्यावरण व वन्यजीव क्षेत्रात केलेल्या आपल्या भरीव कामगिरीमुळे माजी.राष्ट्रपती.रामनाथ कोविंद यांच्याहस्ते नारी शक्ती- राष्ट्रपती पुरस्काराने सन्माननीत करण्तात आले असुन त्यांच्या सन्मानार्थ भारतीय डाक विभागाने यापूर्वीच टपाल तिकीट जारी केले आहे. महाराष्ट्र सरकारने ही त्यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार दिला आहे. राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय सेवा सम्मानाने ही त्यांना राजभवन मुंबई येथे गौरविण्यात आले आहे. 51000 हून अधिक सापांना लोकवस्तीतून पकडून जंगलात सोडल्याचा विश्वविक्रमही वनिताताईंनी नोंदविला आहे. आज त्या वने,वन्यजीव, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात संरक्षण, संवर्धन व संशोधन करणाऱ्या एकमेव महीला असुन जगातील पहिल्या महीला सर्परक्षक म्हणून अधिकृतपणे त्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घोषित केले आहे. या सोबतच अंतरराष्ट्रीय स्तरावर त्या भारतीय सभ्यता व संस्कृतीचे प्रतिनिधित्व करीत असून शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांना सलग तिसऱ्यांदा नामांकन प्राप्त झाले आहे. यामुळेच वर्ल्ड कन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन यु.एस.ए, डब्ल्यू .एच.ओ, नासा, राष्ट्रसंघ यु.नो यासोबतच पी.एफ.ए.या सारख्या राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय संस्थांनी आजीवन सदस्यत्व दिले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळेच दि.11 सप्टेंबर 2022 रोजी सिरी फोर्ट ऑडिटोरियम, दिल्ली येथे अशियाई देशांतर्फे अर्थात जर्मनी,जापान,वियतनाम,इन्डोनेशिया, श्रीलंका,मलेशिया आणि थाईलंड या सर्व देशांमार्फत जगातील 100 वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश झाल्याबद्दल व सर्वोच्च नोबेल पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त झाल्याबद्दल जाहिर सत्कार करण्यात आला.यामधे प्रमाणपत्र, मानचिन्ह व पदक त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे डॉ. बिश्वास रॉय चौधरी, वियतनाम चे माजी.उपमुख्यमंत्री व विद्यमान वियतनाम बुक ऑफ रेकॉर्ड चे संपादक ले ट्रान ट्रॉंग अॅन व वर्ल्डकिंग रेकॉर्डचे सर्वे-सर्वा आणि नेपाल रेकॉर्ड बुक चे डॉ. दिपक चंद्र सेन, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड चे सेलविया मुहियाहा, इंडोनेशिया म्युझियम रेकॉर-दुनिया चे ऑसमार सुसीलो, यु.एस.ए रेकॉर्ड ऑर्गनाइजेशन चे मॅक बीया उपस्थित होते.











