अविनाश पोहरे
ब्युरो चिफ,अकोला
पातुर : डॉ. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात बीए प्रथम वर्ष आणि बीकॉम प्रथम वर्षाच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ दिनांक 29 आणि 30 ऑगस्ट 2022 ला संपन्न झाला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. किरण. एस. खंडारे हे होते.विचार पिठावर इतिहास विभागप्रमुख डॉ. व्ही.जी.वसू, ग्रंथालय प्रमुख प्रा.अतुल विखे,मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.ममता इंगोले. महाविद्यालयीन आय. क्यू. ए.सी.समन्वयक डॉ.संजय खांदेल, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.दिपाली घोगरे,वाणिज्य विभागप्रमुख प्रा.हर्षद एकबोटे, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. धनंजय अमरावतीकर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतीमा पुजन व दिपप्रज्वलन करुन झाली. याप्रसंगी प्रा.उज्वला मनवर यांनी स्वागत गीत सादर केले.विद्यापीठ गीतानंतर कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्रा.डॉ.ममता इंगोले यांनी केले. याप्रसंगी उपस्थित प्राध्यापक मंडळींनी आपल्या अध्यापन विषयाचे महत्त्व प्रतिपादित केले. प्राचार्य डॉ.किरण. एस. खंडारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी पूरक उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांचा परिचय करून दिला. तसेच विद्यार्थ्यांनी नियमित तासिकाना उपस्थित राहून ज्ञान संपादावे तसेच शैक्षणिक मूल्यांबरोबर नैतिक मूल्य जोपासून आदर्श नागरिक निर्माण व्हावा असा आशावाद व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समिती समन्वयक डॅा. दिपाली घोगरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.सुवर्णा गोतरकर यांनी केले.या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.याप्रसंगी डॉ.रोनील आहाले, प्रा.सारिका पाचराउत, प्रा.मुकुंद कवडकर,प्रा. महादेव टापरे,प्रा मिलिंद वाकोडे, तसेचं महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.