कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुणवंतराव देशमुख परिसर कवडीपूरमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली असून अजय शालीकराव येवले वय ४० वर्ष राहणार ओम नगर असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस आणि वसंत नगर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केलं व अवघ्या काही तासातच यातील आरोपी गजानन काळे आणि शेख समीर शेख सलीम दोन्ही राहणार श्रीरामपूर यांना अटक करण्यात यश आले आहे. मृतक अजय येवले याने आरोपी गजानन च्या आईला शिवीगाळ केल्याने त्याचा राग मनात ठेवून बुधवरी रात्री १ ते १;३० वाजताच्या सुमारास दगडाने मारून अजय येवले याची हत्या केली. हत्याकरून दोन्ही आरोपी फरार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी गोपनीय माहितीवरून दोघांना पुसद बस्थनाकातून अटक करण्यात यश आले. सदरची कारवाई वसंत नगरचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक चव्हाण, मुन्ना आडे, कुणाल मुंडोकार, संजय पवार, सतीश शिंदे, चालाक अनंता तारमेकवाड यांनी पार पाडली. पुढील तपास पोलीस करीत आहे.