सुमित सोनोने
तालुका प्रतिनिधी मुर्तिजापूर
मुर्तिजापुर : शहरामध्ये असलेल्या शासकीय कार्यालयातील कार्यरत बहुतांश कर्मचारी बाहेरगावा वरुन येणे-जाणे करतात.या समस्येला शहरा बरोबरच तालुक्यातील ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे.साहेब सुटटीवर आहे,साहेब अजून आले नाही.तुमचे काम व्हायचे आहे,साहेबाची सही राहिली,आम्हाला कामे भरपूर आहे.अशा विविध उत्तरांनी नागरिकांची निराशा होते.ज्या कामाला 7 ते 10 दिवस लागतात ती कामे अशा कारणांनी महिने – महिने होत नाही . कर्मचाऱ्यांच्या उशीरा येण्याच्या धोरणाने नागरिकांना कार्यालया बाहेर वाट बसावे लागतेच आणि कधी जर साहेब हजर असले तर इतर कामांना प्राधान्य देवून सामान्य नागरिकांना तासन – तास वाट पहात बसावे लागते.ग्रामीण भागातील नागरिकांना आपली मजूरी पाडून आपली कार्यालयीन कामे करण्याकरिता यावे लागते.जर त्यांचे काम नाही झाले तर त्यांना मजूरी तर सोडाच परंतू कामाची चिंता जगा तर सतावते व आर्थिक नुकसान सुध्दा होते.अशा या गंभीर प्रकरणाकडे वरिष्ठांनी जातीने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची चर्चा सर्व सामान्य नागरिकांना मध्ये आहे.











