जितेंद्र लखोटीया
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
(तेल्हारा) हिवरखेड : सर्वांनी आपापली धार्मिक उत्सव साजरी करताना कायद्याचे भान ठेवून आपले उत्सव साजरे करावे. गणपती उत्सव विसर्जना निमित्त गणेश मंडळ व शांतता समिती बैठकीमध्ये ठाणेदार धीरज चव्हाण यांनी आवाहन केले आहे.दोन दिवसीय चालत असलेल्या विसर्जण मिरवनूक शांतता व गूण्यागोविदाने पार पाडावी अशी सुचना व उपस्थित गणेश मंडळ पदाधिकारी ,पत्रकार, शांतता समिती पदाधिकारी याचे समोर बोलताना सांगितले तर हिवरखेड पोलीस स्टेशनच्या आवारात गणपती ऊत्सव व विसर्जण निमीत्त गणेश मंडळ तथा शांतता समीतीची बैठक दि. 8/92022 आयोजीत केली होती.दोन दिवसीय चालत असलेल्या गणेश वीसर्जण मिरवणुक शांतता व गूण्यागोविदाने पार पाडावी अशी सुचना ठाणेदार धिरज चव्हाण यानी उपस्थित मंडळ पदाधिकारी ,पञकार, शांतता समिती पदाधिकारी याचे समोर बोलताना सांगीतले. मडळांकडुन आलेल्या सूचनांचे ठाणेदार चव्हाण यांनी समाधान केले. तर आमचे गावातिल हिंदू- मूस्लीम सर्व गूण्यागोंवीदाने नांदत असुन हनुमान मंदिर व मस्जिद ची भिंत एकत्र आहे. तसेच आम्हीसुद्दा गुण्यागोंवीदाने राहतो असे शांतता समीतीचे सदस्य मुन्नाभाई मिरसाहेब याप्रसंगी आपले मत व्यक्त केले. दोन दिवस चालनार्या गणेश उत्सव दरम्यान दारु दूकाने , अवैध दारुचे दूकाने सुद्दा बंद ठेवावी अशी सुचना पुरुषोत्तम पाटील यांनी मांडली. मंडळाकडुन किरण सेदानी यांनी डी.जे.वाजविणे सदर्भांत मिरवनुक मार्गावरील सर्विस लाईन तानने, खड्डे बुजविणे, तसेच इत्यादी समस्या मांडल्या तर शेवटच्या दिवशी बारा पर्यत विसर्जन ची वेळ द्यावी असे मंडळाकडुन विनंती करण्यात आली.तर ठाणेदार धिरज चव्हाण यांनी मंडळाकडुन मांडलेल्या सुचनावर वरीष्टाशी विचार विनिमय होइल. ग्रामपचांयतने सुद्धा मिरवनुक मार्गावरील अतिक्रमण, स्वच्छता, विद्यूत विभागाने सर्विस लाइन व्यस्थित कराव्या अशा सुचना करण्यात आले. पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये गवई मेजर,पोलीस पाटील प्रकाश गावंडे, शोयबअली मिरसाहेब, महेद्र भोपळे,पुरूषोत्तम गावंडे,जमिरखाॅ पठान, किरण सेदाणी, बंजरग तिडके,राजूखाॅन, प्रवीण येऊल,विलास घूंगड, रविराणा घूंगड, सुनिल इंगळे, संदिप इगंळे , मनीष भुडके, बाळासाहेब नेरकर, सूरज चौबे, अर्जुण खिरडकार, जमिरशेख तसेच सार्वजनीक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य हजर होते.










