सतिश मवाळ
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
मेहकर : तालुक्यातील कासारखेड येथील लोकमान्य गणेश मंडळाला बाविस वर्षाची उज्वल परंपरा असुन यावर्षी या मंडळातर्फे पाच फुट उंच आकर्षक अशा श्रीगणेशाच्या मुर्तिची स्थापना करण्यात आली आहे. या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गावातील भाविक सकाळ सायंकाळ गर्दी करीत असतात. दरवर्षी नाविन्य पुर्व कार्यक्रम घेण्यात येतात या वर्षी टेनिस बॉलवर क्रिकेट चे आयोजन करून गावातील सहा टिमा खेळण्यात आल्या होत्या व सर्व टिमांना प्रदिप मवाळ कडून मंडळाला ट्राफ्या देण्यात आल्या त्यांचे वितरण मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. शरद गोटे हरिदास मवाळ सतिश मवाळ आत्माराम मवाळ बाळकृष्ण सवडतकर यांच्या हस्ते सर्व टिमच्या कर्णधार चे शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दरवर्षी प्रमाणे या वर्षी मिरची भाजी महाप्रसाद घेण्यासाठी गावातील सर्व समाजातील मंडळी उपस्थित होती . लोकमान्य गणेश मंडळाचे अध्यक्ष दसरथ मवाळ, भागवत मवाळ, श्याम गोटे, विशाल मवाळ, प्रदीप मवाळ, समाधान मवाळ, गजानन मवाळ, प्रविण मवाळ, दत्ता बळहे अंभोरे नागरिक मंगेश मवाळ संजय मवाळ, धोंडगे राठोड मेसरे, वानखेडे चव्हाण सर्व गावातील गणेश भक्त उपस्थित होते.