शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगराळ व दुर्गम भागातील खिरकुंड गावातील आड नदीच्या काठावर पहाटेचे वेळी गावठी हातभट्टीची दारू गाळली जाते. अशी गोपनीय माहिती पो.स्टे अकोट ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख ह्यांना प्राप्त झाली. त्यावरून त्यांनी सदर माहिती पो.हे.कॉ. गजानन भगत, पो.ना.अजय माहोरे, पो. कॉ. सागर नागे ह्यांना दिली.
त्यावरून नमूद अंमलदार ह्यांनी आज दिनांक 07/09/2022 रोजी पहाटे खिरकुंड ह्या गावाचे जवळीक आड नदीचे काठावर अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू गाळणारा इसम नामे अंजु तुळशीराम तोटे, वय 22 वर्ष, रा. खिरकुंड बु. ह्याचे ताब्यातून 1) दोन कॅन मध्ये 20 लिटर गावठी हातभट्टी दारू किंमत 2,000 रु. 2) 06 टिनाचे डब्यामध्ये 60 किलो मोहा सडवा किंमत 6,000 रु. 3) 1 स्टील गुंड किंमत 100 रु. 4) 02 नरसाळे किंमत 30 रु असा एकूण 8,130 रु चा माल व साहित्य मिळून आल्याने नमूद मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही मा. रितू खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट , नितीन देशमुख पोलीस निरीक्षक अकोट ग्रामीण ह्यांचे मार्गदर्शन पो.हे.कॉ. गजानन भगत, पो.ना. अजय माहोरे, पो. कॉ. सागर नागे ह्यानी केली.