जितेंद्र लाखोटिया
ग्रामीण प्रतिनिधी, हिवरखेड
हिवरखेड : शहरातील आपल्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमांसाठी ओळख असणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अविरत झटणाऱ्या शाळांमध्ये गणना होत असणाऱ्या शाळांपैकी सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड या शाळेचे नाव संपूर्ण तालुक्यामध्ये घेतल्या जाते. असाच नाविन्यपूर्ण शिक्षक दिवस सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षक होऊन एक दिवस पूर्ण शाळा स्वतः चालवली या सर्व कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत तिवारी सर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलं होतं या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी इयत्ता दहावीच्यl वर्गाने घेतली होती व त्या वर्गाने ती अत्यंत यशस्वीरित्या पार पाडली यामध्ये इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आचल हागे ही मुख्याध्यापक झाली होती तर गायत्री वानखडे ही उपमुख्याध्यापक झाली होती. त्याचबरोबर शाळेचे पर्वेक्षक म्हणून जय वानखडे यांनी आपली जबाबदारी पार पाडली. विद्यार्थ्यानी सकाळी शाळेत आल्यापासून तर शाळा संपेपर्यंत पूर्ण दिवसभर शाळा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः चालवली. यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शिक्षकांचे तासिका सुद्धा शिकवल्या त्याचबरोबर शिक्षक दिनाचे महत्त्व सुद्धा या कार्यक्रमातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत तिवारी हे होते. यावेळेस विद्यार्थ्यांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले यामध्ये कृष्णन गावंडे मृणाल हागे, श्रेयस टोहरे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर शाळेतील शिक्षक स्वप्निल कातव व चैतन्य खारोडे, रवींद्र वसे यांनी आपले विचार व्यक्त केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना शिक्षकाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.